'ज्याशी दु:खांनी गांजले, तेचि सोयरे आपुले' हे ब्रीद घेऊन ग्रामीण जीवन व बहुजनांच्या अभ्युदयासाठी झटलेल्या 'दीनमित्र' या नियतकालिकाच्या जन्मास २३ नोव्हेंबर २०१० रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली. सत्यशोधक मुकुंदराव पाटील यांनी नगर जिल्ह्यातील सोमठाणे (ता. पाथर्डी) व तरवडी (ता. नेवासा) सारख्या खेडेगावांतून हे नियतकालिक तब्बल ५७ वर्षे अव्याहतपणे प्रसिद्ध केले. हे देशातील दुर्मिळ उदाहरण मानले जाते. जन्मशताब्दीच्या निमित्ताने 'दीनमित्र'च्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत.
मराठी पत्रकारितेच्या इतिहासात 'दीनमित्र'ची सुवर्णाक्षरांनी नोंद झाली आहे. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना इतिहास शिकताना 'दीनमित्र'चा आढावा घेऊनच पुढे जावे लागते. इतके 'दीनमित्र' या नियतकालिकाचे मराठी वृत्तपत्रसृष्टीत मौलिक स्थान आहे. महात्मा फुलेंनंतर 'दीनमित्र'नेच खऱ्या अर्थाने 'आसुडाचे फटके' ओढले. परंतु हे नियतकालिक नगरमधील तरवडी व सोमठाणे सारख्या खेडेगावांतून प्रसिद्ध होत होते याची आज जिल्ह्यातीलच अनेकांना कल्पनाही नसावी. त्याअर्थाने 'दीनमित्र'ची व मुकुंदरावांचीही जिल्ह्याने व राज्याने उपेक्षा केली आहे.
महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीतील महत्त्वाचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी बहुजन उद्धारासाठी 'दीनमित्र' हे नियतकालिक सुरू केले होते. त्यांनी तसेच काही काळ त्यांचे भाचे गणपतराव पाटील यांनी हे नियतकालिक चालविले. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे ते बंद पडले. कृष्णरावांच्या निधनानंतर २३ नोव्हेंबर १९१० रोजी त्यांचे पुत्र सत्यशोधक मुकुंदराव पाटील यांनी 'दीनमित्र'चे पुनरुज्जीवन केले व तब्बल ५७ वर्षे अव्याहतपणे ते चालविले. सोमठाणे सारख्या खेड्यांत 'दीनमित्र' प्रकाशित होऊन राज्यभर वितरित होत असे. नंतर ते तरवडी येथून प्रसिद्ध होऊ लागले.
शेतकऱ्यांकडून पसे जमा करून व अक्षरश: तरवडीहून नगरला पायपीट करून त्याकाळी मुकुंदरावांनी 'दीनमित्र' चालविले. 'दीनमित्र'ने ब्राम्हणी व्यवस्थेवर व प्रसंगी गावोगावच्या पाटलांवरही कठोर हल्ले चढविले. त्यामुळे काही अधिकाऱ्यांनी 'दीनमित्र'च्या निर्मितीत अडथळेही आणले. 'दीनमित्र'चा छापखाना शेतीच्या जमिनीत होता. शेतीची जमीन बिनशेतीच्या कामासाठी वापरली जाते असा कावा करत त्यावेळी 'दीनमित्र'ला दंड ठोठावण्यात आला होता. अशावेळी शाहू महाराजांनी मुकुंदरावांना आर्थिक मदत केली. शेतीवर काम करणाऱ्या कामगारांना छपाईचे तंत्र शिकवून मुकुंदरावांनी हे पत्र चालविले. त्यामुळे अनेक संशोधकांनी त्यांचा देशातील पहिले ग्रामीण पत्रकार म्हणून उल्लेख केला आहे.
'दीनमित्र' सोबतच मुकुंदरावांनी 'कुलकर्णी लीलामृत', 'शेटजी प्रताप', 'देशभक्त लीलासार' या ओवीबद्ध ग्रंथांतून अज्ञानी व दरिद्री शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या कुलकर्णी, सावकार व लबाड पुढाऱ्यांवर कोरडे ओढले. या लिखाणामुळे मुकुंदरावांवर खटले भरले गेले तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही मुकुंदरावांना सहाय्य करण्याची भूमिका घेतली इतके 'दीनमित्र'लोकप्रिय होते. कुलकर्णी वतनाची पद्धत बंद होऊन तलाठी पद्धत लागू होण्यात महत्त्वाची भूमिका आहे ती मुकुंदरावांनी लिहिलेल्या कुलकर्णी लीलांची. 'शेतकऱ्यांसाठी रडणारे आहेत पण राबणारे नाहीत, 'शेतकरी, मजुरांनो मान वर करा, 'शेतकऱ्यांनी जगायचे कसे?' अशा खड्या अग्रलेखांतून 'दीनमित्र'ने कुणब्यांची वकिली केली. १९६७ साली मुकुंदरावांच्या निधनानंतर 'दीनमित्र' बंद पडल्यानंतर 'दीनमित्र'चा छापखाना नगर येथील ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात जतन करण्यात आला आहे. त्यांचे काही साहित्य मुकुंदराव पाटील स्मारक समितीने प्रकाशित केले आहे. परंतु अजूनही अप्रकाशित साहित्य असून त्यासाठी निधीची आवश्यकता आहे. समितीचे अध्यक्ष पांडुरंग अभंग, सचिव उत्तमराव पाटील, बाबा अरगडे हे या सत्यशोधकाच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु दुर्देवाने नगर जिल्हा व महाराष्ट्रही या कामात म्हणावा तसा हातभार लावताना दिसत नाही.
रावसाहेबांची उपेक्षा !
मुकुंदरावांचे साहित्य व 'दीनमित्र'च्या जुन्या आठवणी जपण्याचे काम तरवडी येथील मकुंदराव पाटील स्मारक समिती करत आहे. या समितीने मुकुंदरावांचे साहित्य व अग्रलेखांची काही पुस्तके प्रकाशित केली आहेत. 'दीनमित्र'चे पन्नास वर्षाचे अंक, पत्रव्यवहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकुंदरावांना लिहिलेली तार अशा अनेक आठवणी या समितीकडे आहेत. परंतु मुकुंदरावांचे योग्य स्मारक होऊन हे साहित्य जनत होण्याची गरज आहे. मुकुंदरावांच्या साहित्यावर १३ संशोधकांनी पीएच.डी. केली व अनेक विद्यापीठांनीही अभ्यासक्रमात या साहित्याचा समावेश केला. मुकुंदरावांना इंग्रज सरकारने 'रावसाहेब' पदवी दिली होती. परंतु महात्मा गांधी यांचा खून झाल्यानंतर मुकुंदरावांनी 'रावसाहेब' ही पदवी परत केली. रावसाहेबांनी समाजासाठी पदवीही त्यागली. समाजाने मात्र या रावसाहेबांची उपेक्षा केली.

No comments:
Post a Comment